जनसंकल्प प्रतिष्ठान मार्फत १०,१२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा फ्री सेमिनार चे आयोजन


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष भाजपा श्री कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक १० आॅगस्ट २०१९ रोजी म्हसळा येथे जनसंकल्प प्रतिष्ठान मार्फत १०,१२वी व पदवीधर विद्यार्थी यांच्या करिता स्पर्धा परीक्षा बाबत फ्री सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा प्रसंगी देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली सेमिनारला प्रमुख मार्गदर्शक प्रा. विकास सावंत उपस्थित होते, अतिशय सुंदर शब्दात विदयार्थी वर्गाल प्रबोधन केले, कोकणातील युवक स्पर्धा परीक्षा मध्ये का अपयशी होतात यांची कारणे थोडक्यात सांगितली, आपण जिवनात काय करायचे हे आपण ठरवले की आपण तयारी करतो म्हणून आपण प्रथम काय बनायचे हे पहिले ठरवावे असे सांगितले तसेच मा. कृष्णा कोबनाक हे यशस्वी उद्योजक व राजकीय व सामाजिक कार्या बाबतीत अनुभव कथन केले व जिवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे, जिद्द, चिकाटी व संघर्ष करूनच यशस्वी होऊ शकतो असे त्यानी सांगितले. यावेळी मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी कश्मीर बाबतीत ३७० कलम रद्द केल्या बदल अभिनंदन करण्यात आले.येथे १०वी, १२ वी परीक्षा पास झालेल्या सर्व विदयार्थ्याना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह संस्थे मार्फत देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक सचिव अमित कोबनाक युवा मोर्चा जिल्हा चिटणीस महेश पाटील, सोशल मिडिया जिल्हा सह संयोजक प्रकाश कोठावळे, वसंत शेडगे, राकेश हेंलोडे, भाजपा सरचिटणीस तुकाराम पाटील, शरद चव्हाण,आनंद कोबनाक, दिलीप कोबनाक, मीनाताई टिंगरे, जयसिंग बेटकर, मंगेश मुंडे, अनिल टिंगरे, सुनील शिंदे, विश्वनाथ कदम, दिनेश काप,प्रशांत महाडीक, प्रह्लाद महाडीक, समीर धनसे अशा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा सेमिनार यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा