दिघी ( गणेश प्रभाळे ) - श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी तारीख 29 रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास जाळ्यात कासव आढळून आले. ग्रामस्थांनी अडकलेल्या कासवाला जीवदान दिले.
जून महिन्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली. सद्या मच्छीमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात समुद्री कासव अडकले .समुद्राला आलेल्या भरती मुळे जाळे किनाऱ्यावर फेकले गेले सदरच्या जाळ्यात अडकून कासव किनाऱ्याच्या जवळ आले .जाळे भेदून बाहेर पडणे कासवाला शक्य झाले नाही . त्यामुळे जाळ्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे कासवाला शक्य नव्हते अशा जाळ्यात गुंतलेल्या अवस्थेत कासव दिवेआगर मधील तरुणांना आढळले. जीवरक्षक प्रितम भुसाने व त्यांचे सहकारी मित्र संतोष भाटकर, मन्सूर बोदलाजी यांना जाळ्यात अडकलेले कासव निदर्शनांस आले . त्यानी दिवेआगर सरपंच उदय बापट यांना सदरची बाब कळवली .जाळयात अडकलेल्या कासवाला व्यवस्थित पणे बाहेर काढण्याचे काम प्राणी मित्रांनी योग्य पद्धतीने पार पाडले .कासवाला पुर्ववत समुद्रात सोडण्यात आले .


Post a Comment