रायगड जिल्ह्यांतील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाचे १३, स. पो.नी.१९ व पो.निरीक्षक पदावरील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. म्हसळा पोलीस स्टेशनला पी.एन. कांबळे यांची तर अन्य १० पुढील प्रमाणे म.पो.नी. एस.जी. तानवडे (रसायनी), ए.आर. भोर (कर्जत), आर.एम. परदेशी (महाड तालुका ), डी.बी. क्षिरसागर ( रोहा), एस.जी.गेंगजे (तळा), आय. व्ही. काटकर (पेण), एन.एम.गवारे ( सुरक्षा शाखा आलिबाग ), एच.आर. डंगारे ( नियंत्रण कक्ष), एस.एल. पाटील (जिल्हा विशेष शाखा ), पी.डी.बाबर ( पो.अ.वाचक) सर्व बदल्या प्रशासकीय आहेत. संबंधीत पो. स्टेशनला सर्व अधिकारी तात्काळ हजर होणार आहेत. म्हसळा पोलीस स्टेशनला मंजुरी प्रमाणे पोलीस निरीक्षक पद व अन्य २ पी.एस.आय. पदे भरावीत अशी मागणी माजी सभापती महादेव पाटील, अन्य राजकीय पक्ष व प्रेस क्लबची होती.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा