नगरपंचायतीचे दुर्लक्षामुळे : म्हसळा पोलीसांचा वाढते काम



संजय खांबेटे : म्हसळा  वार्ताहर
   म्हसळा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या वाढत्या संखेमुळे सातत्याने ट्रॅफीक जामची समस्या वाढत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधी कृतपणे वाहने पार्कींग करणे , हातगाडी लावणे, टपऱ्या , बांधकामे, बाजारपेठेत असणारी उनाड गुरे या सर्वच कारणाने   म्हसळा शहरातील पाभरे नाका ते दिघी नाका या परिसरांत सततची ट्रॅफीक जाम हा प्रकार सातत्याने होत असतो. दिवसेंदिवस शहरांतील मुख्य रस्त्यासह अंर्तगत रस्त्यांची सुद्धा तीच स्थिती आहे.

म्हसळ्याचे मच्छिमार्केट ठरते पर्यटकाना आकर्षण 
श्रीवर्धन- दिवेआगर -हरीहरेश्वर परिसरांतून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकाना म्हसळ्यातील सुकी व ओली  मच्छी आकर्षित करते . हेच पर्यटक बाजारपेठेत कधीही कुठेही कसेही आपले वाहन थांबतात त्यामुळे सुद्धा  सातत्याने ट्रॅफीक जाम होत असते.
रितेश अय्यंगार, म्हसळा



म्हसळा नगर पंचायत करते  कर्तव्यात कसूर
म्हसळा गृप ग्रामपंचायतीचे अपग्रेडेशन नगरपंचायतीत झाले.केवळ विविध टॅक्स वाढवून आपण काही तरी वेगळे करीत आहोत असा भास मुख्याधीकारी व नगरपंचायतीने  करून नागरिकांची केवळ दिशाभूल केली अशी नागरिकांची खात्री झाली आहे. नगरपंचायतीने  शहरांत वन वे, टू व्हिलर व फोर व्हिलर पार्किंग, रिक्षा स्टँड,याच बरोबरीने No Parking झोन करणे , गुरांचे योग्य नियोजन, कोंडवाडयाची सुविधा तयार करणे प्राधान्याचे व महत्वाचे आहे.
विवेक सहस्त्रबुध्दे , म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा