प्रतिष्ठान ने दिलेले बॅरिकेटस् हे ट्रोफिकचे नियोजन करण्यास मोलाचे ठरणार तहसीलदार – शरद गोसावी
म्हसळा : निकेश कोकचा
डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान मार्फत म्हसळा पोलीस ठाण्याला 8 मे 2019 रोजी 20 बॅरिकेटस् देण्यात आले.हे बॅरिकेटस् म्हसळा येथील कन्या शाळा सरस्वती सभागृहामध्ये म्हसळा तहसील कार्यालयाचे तहसीलदार शरद गोसावी म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.प्रभे म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे तसेच पोलीस शिपाई कराडे त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे श्रीसदस्य बहु संख्येने उपस्थित होते.
यावेळी बॅरिकेटस् वितरण वेळी तहसिलदारांनी प्रतिष्ठानचे भरभरून कौतुक केले.प्रसंगी प्रतिष्ठानी आजवर तालुक्यात थंडगार शुद्ध पाण्याच्या दोन पाणपोया बांधून आज तालुक्यात हजारो लोकांना दिवसाला गार शुद्ध पाणी पाजण्याचे महान कार्य प्रतिष्ठानने केले आहे.त्याच बरोबर तालुक्यात दरवर्षी संपूर्ण तालुक्याची स्वच्छता मोहीम करून तालुका सुजलाम सुकलाम केला आहे.गेल्या महिना भरापूर्वी तालुक्यातील शेकडो स्मशानभूमी स्वच्छ करण्याचे काम केले आहे. कारण सगळ्याच ठिकाणी स्वच्छता करण सोप आहे. परंतु स्मशानभूमी स्वच्छ करणारे प्रतिष्ठान डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी हे आहे.कारण स्मशानाना मंदिर करण्याचे काम डॉ.श्री.आप्पासाहेबांनी केले आहे.याचे ज्वलंत उदाहरण देताना म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आपल्या अनुभवातून प्रतिष्ठानची शिस्त काय असते याचे स्पष्टीकरण दिले.
महाड मधील महाराष्ट्र भुषण पुरस्कारा दिवशी रस्त्याच्या दोन्ही बाजूस ट्राफिक लागली होती परंतु त्या ट्राफिकला एक हि श्रीसदस्य ओहर टेक न मारता आपल्या प्रतिष्ठानच्या शिस्तीचे पालन करत होते.आम्ही निवांत खुर्चीत बसलो होतो असा शिस्तप्रिय अध्यात्मिक मार्ग डॉ.श्री.नानासाहेबांनी साऱ्या जगात प्रेरित केला आहे.त्याच बरोबर म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.प्रभे यांनी प्रतिष्ठानची सामाजिक एक जुठ काय असते याचे उदाहरण देऊन सखोल माहिती सांगितली अखेर प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांच्यासमवेत म्हसळा पोलीस स्टेशनलाबॅरिकेटस् देण्यात आले.


Post a Comment