प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
विकास प्रबोधिनी , भांडूप , मुंबई आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन- २०१९ नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह , के.डी. एम. सी.डोंबिवली येथे संपन्न झाले.
आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उदघाटन जेष्ठ साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड , आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे , संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष श्रीकृष्ण टोबरे या सर्वांच्या शुभ हस्ते जीवन संघर्षकार कवी लेखक नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर २०१९ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे नवनाथ रणखांबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
नवनाथ रणखांबे यांचे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्वाचे योगदान आहे.त्याचे जीवन संघर्ष हे पुस्तक गाजत आहे. विविध वर्तमानपत्रात ते पुस्तक परीक्षणे , कविता लिहित असतात. सामाजिक, शैक्षणिक, कला , सांस्कृतिक, साहित्य, कामगार संघटन इ.विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत. रणखांबे विविध सामाजिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत असतात. त्यांनी अनेक कवी संमेलनाचे आयोजन केले असून ते कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करीत आले आहेत. ते "शिव शाहू फुले आंबेडकर", आणि थोर महान पुरुष यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रात करीत आहे.कवी कट्टा ग्रुप कल्याण - मुंबईचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आजपर्यत समाज्यातील गुणवंत ४० लोकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. कवी संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात ते जेष्ठ आणि नवोदित कवींना विचारपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि मानवता वादी कवी घडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत आहेत. या पूर्वीही त्यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब कृतज्ञता पुरस्कार , छ. शिवाजी महाराज पुरस्कार , काव्य लेखन पुरस्कार, अक्षर भूषण पुरस्कार ,राज्यस्तरीय सामाजिक कार्य पुरस्कार इ. अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
Post a Comment