म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
लोकशाही प्रधान भारत देशात आपल्या हक्काचे सरकार निवडुन आणण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे तसे होण्यासाठी शासनाचे वतीने मतदारांना होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार म्हसळा शहरात मतदारांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिनांक 23 एप्रिल रोजी मतदान करण्याचा हक्क असलेल्या सर्वांनीच मतदान करून आपल्या हक्काचे सरकार निवडावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग मार्फत "मतदान एक जबाबदारी" प्रिझम संस्था अलिबाग येथील मुलामुलींनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. म्हसळा दिघी नाका येथे संपन्न जनजागृती कार्यक्रम मोहिमेत म्हसळा महसुल विभागाचे तलाठी पाटील, सर्कल मंगेश पवार उपस्थित होते.

Post a Comment