महीलेचा आत्महत्येचा प्रयत्न ; वाचवायला गेला तोही भाजला


संजय खाांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यातील चिचोंडे आदीवासी वाडी येथील कमल राजेश पवार वय ३० या महिलेने कौटुंबीक भांडण झाल्याने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यामध्ये ती सुमारे ८० % भाजली. यावेळी तिला वाचवायला गेलेला तिचा नवरा राजेश हा ४० % भाजल्याचे समजते.कमल व राजेश हे मूळचे चिचोंडे आदीवासीवरील जोडपे आंबे राखणदार म्हणून आंबा बागायतीत होते कमलचे मुलांकडे व कुटुंबात व्यवस्थित लक्ष नसते या छोट्याशा कौटुंबीक कारणांतून नवरा -बायकोचे भांडण झाले राग अनावर झाल्यामुळे कमलने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली. कमल पेटल्याचे बघून राजेशने घाबरून आग विझविण्यासाठी तीला मिठी मारली व उचलून नदीत उडी मारली . यामध्ये कमल सुमारे ८० % व  तिला वाचवायला गेलेला तिचा नवरा राजेश हा ४० % भाजल्याने दोघांवर म्हसळा येथील ग्रामिण रुग्णालयात डॉ. महेश मेहता यानी  प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी  आलिबाग येथे पाठविण्यात आले.


भाजण्याचा प्रकार आज सकाळी ११. ३० चे दरम्यान झाला, दुपारी ३ ते ३.३० ला दोघानाही ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मे. कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर मृत्यूपूर्व जबानी झाली. सायं ५.३०पर्यंत म्हसळा पोलीसानी घटनेची नोंद केली नसल्याचे ठाणे अमलदार मोहीते यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा