रायगडात अनंत गीते नावाचा आणखी एक उमेदवार रिंगणात...


रायगड : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदार संघात अनंत गीते या नावाचा आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे . अनंत पद्मा गीते असे या उमेदवाराचे नाव असून , त्याने अपक्ष अर्ज दाखल केला आहे . रायगड लोकसभा मतदार संघात बुधवारी आणखी चार अर्ज दाखल झाले या रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज आणखी दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ . विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली . अर्ज सादर केलेल्या अर्जामुळे अनंत पद्मा गीते ( अपक्ष ) , मिलिंद भागुराम साळवी ( बहूजन समाज पार्टी - अर्ज ) , मधुकर महादेव खामकर ( अखिल भारत हिंदू महासभा ) , संदीप पांडुरंग पार्ट ( बहुजन मा पार्टी ) अशी या उमेदवारांची नावे आहेत . यामुळे आता एकूण नामनिर्देशन पत्रे भरलेल्या उमेदवारांची संख्या १२ झाली आहे . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे या नावाचा असाच अर्ज दाखल झाला होता . याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना बसला  होता , सुनील तटकरेच्या नावाशी मिळते जुळते असलेल्या दुस-या उमेदवाराला १० हजार मते पडली होती . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे २००० मतांनी पराभुत झाले होते . आता अनंत गीतेंच्या नाव साधम्र्याचा दुसरा उमेदवार रिंगणात उतरल्याने , याचा फटका कुणाला बसणार का याची चर्चा सुरू झाली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा