संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या संखेमुळे सातत्याने ट्रॅफीक जामची समस्या निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांत प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमंडली आसल्याचे शहर वासीयांचे म्हणणे आहे.
शहरातील पाभरे फाटा ते दिघी नाका हा सुमारे ६०० मीटरचा महत्वाचा टप्पा आहे. याच परिसरांत दोन ट्रॅफीक पोलीस कार्यरत असताना ट्रॅफीक जॅम होतेच का? हा महत्वाचा प्रश्न सतत ऐरणीवर असतो. याच कारणानी आता शहरातील अंर्तगत रस्त्यांपैकी पोलीस स्टेशन - ब्राह्मण आळी- दातार आळी- साने मोहल्ला तसेच काजी मोहल्ला - मोमीन पुरा- साने आळी या अंर्तगत रस्त्यांवरही अनेक वेळा ट्रॅफीक जॅमची समस्या मान वर काढू लागल्याचे चित्र आहे.
पाभरे फाटा ते दिघी नाका ह्या शहरातील ट्रॅफीक जॅमच्या मुख्य टप्प्यात अरूंद रस्ता , दोनही बाजूने उंच इमारती, तालुक्यातील महत्वाची प्रशासकीय कार्यालये, नगरपंचायत कार्यालय, बँका अशी महत्वाची वर्दळ असणारी कार्यालये , मुख्य रस्त्यालगत दोनही बाजूने उभी असणाऱ्या रिक्षा, मोटर सायकल व अन्य वाहने बेशिस्तपणे लावलेली असतात, जुन्या व नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती रस्त्यापर्यंत बांधलेल्या आसल्याने या पट्टयांत सातत्याने ट्रॅफिक जाम होत असते. यावेळी स्थानिक बाजारहाटीसाठी आलेल्या पादचारी, महीला वर्ग याना रस्त्यावरून चालणेही अडचणीचे होत असते.
शासनाने पुढील महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे नागरिकाना आहे अपेक्षित :
◆ आठवडयाचे ५ दिवस असणारे ट्रॅफीक पोलीस बहुतांश शनीवार-रविवारी नसतात,या दिवशी म्हसळा पोलीसानी आपली कुमक वाढविणे गरजेचे आहे.
◆ नगर पंचायत, R.T.O व पोलीस प्रशासनाचे माध्यमांतून
◆ शहरांतील अंर्तगत रस्त्यांचा निकष ठरवणे व त्या दृष्टीने वापर करणे.( उदा. दुचाकी- तीन चाकी )
◆ श्रीवर्धन -दिघी साठी म्हसळा शहराला असणारा पर्यायी रस्ता प्राधान्याने दुरुस्त अथवा नवीन करणे.
◆ नगरपंचायतीने व्यापारी संकुल किंवा मुख्य रस्त्यालगत इमारतीचे नव्याने बांधकाम करताना पार्कींग सुविधे बाबत सक्तीचे करणे आवश्यक आहे

Post a Comment