खारगांव (बु) सरपंच अर्ज भरताना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थीती.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस -शेका पक्षाने आघाडी घेतली असून
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर व पदाधिकारी पूर्ण ताकदीने निवडणूक प्रक्रियेत उतरले आहेत त्याना शेकापक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील, श्रीपद धोकटे, तुकाराम महाडीक ही मंडळी सक्रीय पणे साथ देताना दिसते. दुसरीकडे शिवसेनेच्या गोटात मात्र खारगांव ( बु) च्या शिवसेनेच्या विद्यमान सरपंचाचा फॉर्म भरताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा अन्य त्यांचे समर्थक आसल्याचे चित्र दिसत होते.
आज दाखल झालेल्या आर्जात खामगाव ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी १ व सदस्य पदासाठी ८ अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी प्रियंका प्रसन्न निंबरे ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) यानी व सुषमा सुरेश जोशी, सीमाबाई सिताराम गायकर, नेत्रा नितीन नवघरे, रुबीना नदीम जोगीलकर,एकनाथ सखाराम खामगावकर ,दर्शना पांडुरंग सातीम, नारायण धर्मा मालप, श्रीकांत बाळू निंबरे ( सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस -शेका)यानी अर्ज दाखल केले. गोंडघर ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदा साठी लहू गणपत तुरे ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) यानी व सदस्य पदासाठी लक्षण भिकू काप, बबन गोवींद भाये व फौजान अक्रम साटविलकर यानी अर्ज दाखल केले. खारगांव ( बु) ग्रामपंचायती सरपंच पदासाठी अनंत धर्मा नाक्ती( शिवसेना ), दिपक लक्ष्मण म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस -शेकाप ), सदस्य पदासाठी प्रदीप निवृत्ती पाटील, अर्चना सतीश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस -शेका), पुष्पा गणेश म्हात्रेत (शिवसेना ), तुळसा किरण भायदे यानी अर्ज दाखल केले.
"शिवसेना खामगाव ग्रामपंचायतीला विशेष लक्ष करणार आसा राजकीय निरीक्षकांचा आदांज आल्याने या चारही ग्राम पंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस -शेका ताकदी निशी उतरला आहे. शिवसेनेच्या हातात एकमेव असणारी खारगाव ( बु ) ग्रामपंचायतीत शिवसेनेला कडवी लढत देऊन लढावे लागेल असा राजकिय निरीक्षकांचा अंदाज आहे"


Post a Comment