डाॅ.ए.आर. उँड्रे इंग्लिश हायस्कूलची श्रीवर्धन शाखेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न


सर्फराज दर्जी-बोर्ली पंचतन

रायगड जिल्ह्यात बोर्ली पंचतन येथील डाॅ.ए.आर. उँड्रे इंग्लिश हायस्कूलची असलेली श्रीवर्धन शहर शाखेचे वार्षिक स्नेहसंमेलन मुख्य अध्यापक मा.श्री.आरिफ अंसारी यांच्या नेतृत्वा खाली  सहावा वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात पार पडला. यावेळी  डाॅ.ए.आर. उँड्रे इंग्लिश श्रीवर्धन हायस्कूल शाखेचे मुख्यअध्यापिका सौ. अरजुमंद हमदुले यांच्या मार्गदर्शना खाली  विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कलाविष्कार-कलागुणांच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राॅयल एड्यूकेशन चे सचीव मा.श्री मसूद दर्जी तथा सहसचिव मा.श्री शब्बरी उँड्रे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर करण्या बरोबर उत्तीर्ण झालेल्या विदविद्यार्थींना मान्यवरांनच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ही करण्यात आले.
 चिमुकल्यांनी सादर केलेल्या जुन्या व नव्या  बहारदार गीतांसह रसिकांचे चांगले मनोरंजन केले.विविध कार्यक्रमास शिक्षकांसह 
ग्रामस्थ, पालकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत कौतुक केले.
 विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी 
 लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळत असून राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनच्या मनोगातात सांगण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.समीर घनसार व इतर शाखेतील शिक्षक , पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा