नगराध्यक्ष चषकाची परंपरा चिरंतर सुरू राहील पाहिजे - सुनील तटकरे


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

 जो पर्यंत आपलं अस्तित्व आहे तो पर्यंत नगराध्यक्ष चषकाची परंपरा चालू राहिली पाहिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदच्या वतीने श्रीवर्धन म्हसळा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीवर्धन नगरपरिषद पहिली नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा व शरीरसौष्ठव स्पर्धाचे उदघाटन प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे, उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, नगरसेवक डॉ अबू राऊत,  दर्शन विचारे, ज्ञानेश्वरशेठ पोलेकर, नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
       यावेळी बोलताना श्रीवर्धन मधील खेळाडू रायगडच्या संघात दिसेल तेव्हा खरा आंनद होईल . शरीरसौष्ठव स्पर्धेत श्रीवर्धन म्हसळा व मुरुड येथील २० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुरुडच्या अभिषेक वर्तक याने पहिल्या नगराध्यक्ष चषकाचा मान मिळवला. त्यास रोख रक्कम १०००१/- व चषक देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट पोझर म्हणून श्रीवर्धनच्या नबील उंड्रे याला सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन वीरेंद्र वाणी व निवास गुरव याना देखील नगराध्यक्ष यांनी सन्मानित केले. 
      कबड्डी स्पर्धेत श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील एकूण १६ संघांनी सहभाग घेतक होता. उदघाटनिय सामना हनुमान क्रीडा मंडळ विरुद्ध गावदेवी वडवली या संघामध्ये खेळवण्यात आला. तसेच अंतिम सामना बोर्ली पंचतन येथील शितलादेवी क्रीडा मंडळ विरुद्ध ओम चिंचबा बोर्ली पंचतन यांच्यात रंगला. या अंतिम सामन्यात शितलादेवी संघाने ओम चिंचबा संघावर मात करत पहिल्या नगराध्यक्ष चषकावर नाव कोरले. प्रथम विजेत्या शितलादेवी संघास रोख रक्कम १५५५५/- व चषक व द्वितीय विजेत्या ओम चिंचबा संघास रोख रक्कम १११११/- व चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय विजेत्या सुवर्ण गणेश संघास व चतुर्थ विजेत्या चिंचमाता संघास रोख रक्कम ७७७७/- व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून रोहन पानकर, सर्वोत्तम चढाई उत्कर्ष पाटील, व सर्वोत्तम पक्कड अक्षय सायगावकर याना देखील चषक देऊन सन्मानित करण्यात आलं.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा