संजय खांबेटे : म्हसळा
राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक, आरोग्य संवर्धनात्मक , उपचारात्मक, पुनर्व नात्मक सेवांव्दारे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर केंद्र व राज्य शासना मार्फत प्रयत्न केले जातात. सर्वसामान्यांपर्यंत पारदर्शक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्रिस्तरीय आरोग्य सेवांच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना कार्यान्वीत होत असतात. त्यामध्ये आपतकालीन वैद्यकीय सेवा, आयुष्यमान भारत, जिल्हा रुग्णालय, केमो थेरेपी सुविधा, फिरते वैयकिय उपचार केंद्र असे विविध उपक्रम शासन राबवित आहे, सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा थेट पोहचाव्या हाच मुख्य उद्देश आहे. रायगड जिल्हाचे आरोग्याचा विचार करता जिल्हात आलिबाग येथे सामान्य रुग्णालय, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, पेण व कर्जत येथे उप- जिल्हा रुग्णालय , उरण, चौक, जसवली, पनवेल, कशेळे , मुरुड, म्हसळा, महाड, पोलादपूर येथे ग्रामिण रुग्णालय व माथेरान, पनवेल व रोहा या तीन ठिकाणी नगर पालिका दवाखान्यांचा माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात यासाठी वैयकिय अधिकारी गट अ व वर्ग २ अशा तज्ञ मंडळींमार्फत शासन सेवा पुरवित असते. अकृतीबंधाप्रमाणे जिल्हा साठी १२३ वैयकिय अधिकारी आवश्यक असताना
केवळ ५२ पदे कार्यरत आहेत. वैयकिय अधिकाऱ्यांची ५६ पदे रिक्त आणि १५ ठिकाणचे वैयकिय अधिकारी कामावर नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतून सांगण्यात आले.
जिल्ह्यांतील म्हसळा ग्रामिण रुग्णालयाची परीस्थिती सर्वात वाईट असल्याची परीस्थिती आहे. ग्रामिण रुग्णालयासाठी ३ वैयकिय अधिकारी मंजूर आहेत . एकही पदावर कायमस्वरूपी वैयकिय अधिकारी नेमला नसल्याचे समजते. अशीच परिस्थीती ग्रामिण रुग्णालय जसवली , नगरपालिका दवाखाना पनवेल, रोहा येथे आहे. अन्य रुग्णालयांत ४०ते ५० % वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. जिल्हयात ५२ प्रा.आ. केंद्र, ७ जि. प. दवाखाना व ३६८ उपकेंद्राचे माध्यमातून मिळणारी आरोग्य सेवा अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवा तुटपूंजी मिळत आहे.

Post a Comment