श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
जुन महिन्यात पडलेल्या जोरदार पावसाने श्रीवर्धन तालुक्यातील शहरी व ग्रामीण रस्त्याची पुर्णतः वाट लागली आहे. पावसाचे पडसाद ग्रामीण रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या लगतचा हरवीत रोहिणी रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी हे महत्वाचे बंदर आहे .दिघी ते म्हसळा वाहतुकीचे दोन मार्ग उपलब्ध आहेत. बंदराची अवजड वाहतुक म्हसळा गोंनघर मार्गे वडवली कुडगाव ते दिघी होते. दुसरा मार्ग म्हसळा मेंदडी मार्गे रोहिणी हरवीत ते दिघी असा आहे. हरवीत मार्गा वरून विशेषतः प्रवाशी वाहतुक केली जाते.हरवीत ,रोहिणी ,तुरुबाडी ,काळसुरी, वारळ या गावांच्या दळणवळणासाठी हरवीत म्हसळा रस्ता महत्वाचा आहे. आजमितीस हरवीत गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्याच्या वळण रस्त्यावर भगदाड पडले आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या मोरीची दगडी निघण्यास सुरुवात झाली आहे.वेळीच बांधकाम खात्याने सदर रस्त्याकडे लक्ष न दिल्यास हरवीत मार्गे होणारी प्रवाशी वाहतुक बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हरवीत गावाची लोकसंख्या 850 च्या जवळपास आहे .शालेय विद्यार्थी व मच्छि विक्रेते यांची वाहतुक सदर मार्गावर जास्त प्रमाणात चालते .दिघी हरवीत मार्गे म्हसळा 30 किमी अंतर आहे .हरवीत रस्त्याची अंदाजे रुंदी 16 फुट आहे .हरवीत रस्त्यावर वाहतुक निरंतर चालू आहे . एस टी महामंडळच्या बस च्या फेऱ्या सदर मार्गावर नियमित जात चालू आहेत त्यामुळे मुख्य रस्त्यावर पडलेले भगदाड वाढल्यास सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचा धोका संभवतो आहे .हरवीत मार्गे म्हसळा मार्गावरून नियमित अंदाजे 250 विद्यार्थी मेंदडी व म्हसळा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी जातात . दिघी व हरवीत च्या विद्यार्थी वर्गास पर्यायी मार्ग म्हणून वडवली गोंनघर मार्ग उपलब्ध आहे परंतु सदरचा मार्ग वेळ खाऊ व विदयार्थ्यांसाठी आर्थिक भुर्दंड देणारा आहे .बांधकाम खात्याने वेळीच हरवीत रस्त्या कडे लक्ष न दिल्यास सदर च्या विदयार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते .
रायगडच्या पालक मंत्र्यांनी रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा बांधकाम खाते व ठेकेदार यांच्या वरती सकारात्मक परिणाम होणार की नाही असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे .
हरवीत रस्त्या विषयी मला प्रसार माध्यमातून माहिती मिळत आहे. सदरच्या रस्त्या दुरावस्थे संदर्भात कुठलंही माहिती कळवण्यात आली नव्हती . प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल. जनतेला कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची बांधकाम खात्याकडून व्यवस्था होईल .
-पी टी जेट्टे (अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते श्रीवर्धन)
हरवीत गावाच्या हद्दीत वळण रस्त्यावर मोरीच्या वरती रस्त्यावर खड्डा पडला आहे .त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करत आहे.
- प्रवीण देविदास ढोरे (ग्रामसेवक हरवीत ग्रामपंचायत)



Post a Comment