फोटो - जप्त केलेले वाहन व वनविभागाची टीम.
संजय खांबेटे , म्हसळा
म्हसळ्यात फार मोठया प्रमाणांत खाजगी , सरकारी वनक्षेत्र व खाजण क्षेत्र आहे. याकडे स्थानिक वन व्यवस्थापन कमीटी व वन विभागाचे लक्ष असुनही कमी जास्त प्रमाणात वनाची तोड व चोरटी वाहतुक होत असते. नवनियुक्त वनक्षेत्रपाल निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोरेगाव मंडणगड रस्त्यावर आंबेत गावचे हद्दीत टाटा ४०७ टेंपो M. H.43 /A .D.0757 हा खैराची चोरटी वाहतुक करताना रंगेहाथ पकडला टेंपोतील तीन मजुर पकडण्यात वन विभागाला यश आले.
वनक्षेत्रपाल निलेश पाटील, याना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवरे (वनपाल दासगांव ), एस.जी. म्हात्रे .वनपाल मांदाटणे, संजय चव्हाण, वनरक्षक आंबेत,पी.व्ही. गायकर, ( वनरक्षक दासगांव ) , व्हि.डी. पाटील , एल.एन. इंगलो, बनसोडे ( म्हसळा) यांची टीम रात्र गस्त घालत असताना. वरील वर्णनाचा ४०७ टाटा टेंपो गोरेगाव आंबेत रस्त्यावर भरधाव वेगाने जात असताना थांबविण्याचा प्रयत्न केला असता रात्र व काळोखाचा फायदा घेत टेंपो आंबेत गावांत गेला.आंधाराचा फायदा घेऊन ४०७ चा ड्रायव्हर व मुख्य आरोपी पळून गेला. परंतु टेंपोची कसुन पहाणी करता शटरमध्ये १ ) राम पांडुरंग जाधव वय ४६ २) .अंकुश भागवत कोळी वय ३४,३ ) मंगेश बाबाजी जाधव वय ३० ( सर्व रहाणार महादपोली, पो. मोरबा,ता माणगाव) हे तीन मजुर व सोलीव खैराचे रु. ५८९७ किमतीचे खैराच१० ७ सोलीव तुकडे पकडण्यात पाटील यांच्या टीमला यश आले. सदर गुन्हा ची नौद ०१/ २०१८ -१९ ने करून भारतीय वन अधि नियम १९२७ चे कलम ४१ चे उल्लघन केल्याने
टेंपो व माल जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आल्याचे संजय चव्हाण वनरक्षक अंबेत यानी कळविले आहे.

Post a Comment