श्रीवर्धन आगारच्या प्रवेशद्वारावर पडले भगदाड..

श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन येथील एसटी . आगार प्रवेशद्वारावर पडलेले भगदाड अपघातास कारणीभूत ठरत आहे . प्रवेशद्वारावरच हा खड्डा पडल्याने आगारात ये - जा करताना एसटी . बस चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे . एसटी . बस या खड्ड्यात  आदळत असल्याने एसटी बसचेही नुकसान होत आहे त्यामुळे हा खड्डा बुजविण्याची मागणी एसटी . बस चालकांसह नागरिकांमधूनही जोर धरीत आहे . श्रीवर्धन बस स्थानक हे नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते मात्र या पडलेल्या खड्याकडे श्रीवर्धन बस आगाराचे दुर्लक्ष होताना दिसत आहे हा खड्डा चुकविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रात्रीच्या वेळी एखाद्या दुचाकीस्वाराचा खड्डा न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे . या प्रवेशद्वारावरील खड्ड्यामध्ये लोखंडी बॅलर , लोखर्ड प्लेट व दगड टाकून त्यावर श्रीवर्धन बसस्थानकाने धुकपटी लावली आहे . मात्र यामुळे अपघात होण्याची शक्यता आणखीनच वाढली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची तात्पुरती डागडुजी न करता हा खड्डा कायमस्वरुपी बुजविण्यात यावा , अशी मागणी जोर धरीत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा