म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुका मराठा समाजाचा महाराष्ट्र शासनाच्या विरोधात मंगळवारी ( दि . २४ ) मराठा आरक्षणावरून तीव्र आंदोलनाचा इशारा म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला . सध्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आंदोलन मूक मोर्चा कडून तीव्र आंदोलनाकडे वळले आहे . त्यातच सोमवारी ( दि . २३ ) औरंगाबाद येथे मराठा समाजाने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन केले होते . यामध्ये मराठा समाजाच्या काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली . या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रपर उमटले असून मराठा समाजच्या आरक्षण आंदोलकांनी २४ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती . त्यानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला . व या बंदचे काही जिल्ह्यात हिंसक पडसाद उमटले होते . परंतु म्हसळा तालुक्यातील मराठा समाजाने महाराष्ट्र शासन काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस संपूर्णपणे जबाबदार असल्याचा सदर निवेदनात उल्लेख करून महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध केला आहे व मराठा समाजाला लवकरच आरक्षण न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला . हे निवेदन देते प्रसंगी समीर बनकर , नंदू शिर्के , नंदू सावंत , दत्तात्रय सुर्वे , दयानंद महामुणकर , प्रवीण बनकर , अमित महामुणकर , सागर जाधव , रुपेश साळुंखे, बाबू शिर्के यांच्या समवेत अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
Post a Comment