श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या श्रीवर्धन म्हसळा मार्गे अमेरिका अफवामुळे श्रीवर्धन तालुक्यातील लोकांचे मनोरंजन होत आहे .काही लोक मात्र या अफवांवर विश्वास ठेवून सदरचा खोटा संदेश सर्वत्र पाठवण्यात धन्यता मानत आहेत . म्हसळा Live कडून सदरच्या संदेशाची चिकित्सा करण्यात आले असता असे निदर्शनांस आले की सदरचे तिकीट खोटे आहे कारण तिकिटावर निर्देशित वाहक श्रीवर्धन आगारात कार्यरत नाहीत .शिवाय एकाच वाहकांचा नावाने महाराष्ट्रभर सदरच्या अमेरिका प्रवासाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे .निर्देशित वाहकाचे नाव एच टी साळुंख आहे .सदरचा वाहक रा प प्रशासनात नोकरीवर नसल्याची माहिती मिळाली आहे. म्हसळा ते अमेरिका प्रवास चे भाडे 45 रुपये तिकिटावर दाखवण्यात आले आहे. त्याच सोबत राज्यभर दाखवण्यात आलेल्या सर्व तिकिटावर अमेरिका प्रवास भाडे रुपये चाळीसच दाखवले आहे. सदर च्या प्रत्येक तिकिटावर फॉन्ट बदलून आगाराचे नाव बदलण्यात आले आहे याची सर्वसामान्य व्यक्तींना जाणीव नाही .तिकीट नंबर सुद्धा सर्व तिकिटावर एकच आहे .शिवाय टप्पे 7 निर्देशित केले आहेत .तिकीटवरील दिनांकात प्रत्येक ठिकाणी खाडाखोड केली असून वर्ष मात्र 2017 दाखवले आहे .
व्हाट्सअप वर व्हायरल संदेश खोटा आहे .जाणीव पुर्वक तिकिटांच्या फॉन्ट मध्ये बदल घडवला आहे .सदरचे अमेरिका प्रवासाचे वृत्त खोटे आहे .लोकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती आहे .महाराष्ट्र भर एकच तिकीट दाखवले आहे
रेश्मा गाडेकर (आगार प्रमुख श्रीवर्धन)
Post a Comment