म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा मेंदडी , पाभरे आणि खामगाव असे चार केंद्र असून त्याच्या चार केंद्रापैकी म्हसळा उपकेंद्र हे बंद अवस्थेमध्ये आहे म्हसळा शहरात ग्रामीण रुग्णालय सुरु झाले आहे त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र देखील अस्तित्वात आहे परंतु त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध मेंदडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी गेली अनेक दिवस डॉक्टर नसल्याने तेथील रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे . त्या ठिकाणी ग्रामीण भाग असल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र सोयीचे आणि लाभदायक होते , परंतु त्या ठिकाणी आजही डॉक्टर उपलब्ध करून दिलेला नाही . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . सचिन पाटील यांच्याकडे संपर्क साधला असता त्या मेंदडी दवाखान्यामध्ये डॉ . पाभर येथील आठवड्यातील तीन दिवस जाणार आहेत . असे जरी असले तरी पूर्णवेळ सेवा कोण देणार प्रश्न डोळ्यासमोर आहे . त्यामुळे त्या भागात १५ ते १६ गावांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे
सर्वसामान्य नागरिकांची परवड...
शासन निर्णयानुसार प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळणे हे अधिकारात असताना हा सामान्य नागरिकांच्या अधिकाराची गळचेपी होत आहे . या साऱ्या प्रकाराला जबाबबदार कोण ? असा सवाल आता उपस्थीत होत आहे तालुक्यात प्रत्येक गाव हे डोंगराळ भागात आहे . मूळ शहराकडे येण्याचे म्हटल्यास तशा प्रकारची साधने नाहीत , घरची परिस्थिती हलाखीची आहे अशा अवस्थेमध्ये धाव घ्यायची कुठे ? सामान्य नागरिकांच्या हक्काचे असणारे आरोग्य केंद्र हे बंद अवस्थेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची परवड होत आहे त्यामुळे आरोग्य सेवा वेळेत मिळाल्यास सर्वांना सोयीचे होणार आहे .
मेंदडी भागात अनेक गावे डोंगर दरीत वसलेली आहेत . त्या गावामध्ये शासनाची आरोग्याची सेवा गावात पोहचणे गरजेची असताना तसे काही होत नाही . प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व त्यांच्या नर्स त्या भागातील असणारे उपकेंद्र खरसई व वारळ त्या ठिकाणी देखील उपकेंद्राच्या इमारतीला कुलूप आहे . या सर्व बाबींचा मागोवा घेऊन आरोग्य सभापती नरेश पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शेकाप चिटणीस आस्वाद पाटील यांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार आहेत - महादेव कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते, शेकाप मेंदडी
म्हसळा तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात मेंदडी या ठिकाणी डॉक्टर नसल्याने पाभरे येथील डॉक्टर गायकवाड यांना ३ दिवस मेंदडी या ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत . मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पूर्णवेळ डॉक्टर मिळण्यासाठी माझे कसोशिने प्रयत्न सुरु आहेत .
- डॉ . सचिन देसाई , जिल्हा आरोग्य अधिकारी अलिबाग
मी गेले दोन तीन दिवस मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी गेलो होतो परंतु त्याठिकाणी कोणीच डॉक्टर उपलब्ध नव्हते अनेक वेळा चौकशी केली परंतु कोणीही योग्य उत्तर दिले नाही . अखेर मला खासगी रुग्णालयाचे दरवाजे ठोठवावे लागले .
- जनार्दन खामदेकर, रुग्ण तुरुंबाडी
Post a Comment