श्रीवर्धन एस. टी. आगारात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...


श्रीवर्धन, प्रतिनिधी
एस . टी . महामंडळ आधुनिकीकरणास प्राधान्य देत प्रवाशी सुरक्षेसाठी नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणत आहेत . वाहतुकीचे वाढते प्रमाण , रस्त्यावर वाहनांची गर्दी यामुळे अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे रा . प . महामंडळाने अपघाताची कारणमीमांसा करत चालक तपासनीस अग्रक्रम दिला आहे . एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यातील ४५० चालकाच आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आगार पातळीवर केले आहे . या शिबीरात चालकांचे रक्त फुप्फुस , वृक , कार्यक्षमता कार्यक्षमता , डोळे तपासण , वजन , उंची , रक्तदाब कान छातीचा क्सरे तपासणी केले जात आहे संदर्भित तपासणी करून सदर चा अहवाल विभागीय कार्यालयास सुपूर्द करण्यात येणार आहे असे समजते . लोकसंख्येत विलक्षण वाढ झाल्याकारणे प्रदूषणाचे प्रमाण वाढले . प्रदूषणामुळे आरोग्य घोक्यात आले अतिशय एसटी चालकांची कामगिरी खडतर आहे दिवसातील ८ ते १४ तास कामगिरी चालक बजावतात पर्यायाने आरोग्यासाठी आवश्यक बाघंची पूर्तता । केली जात नाही . आरोग्याची हेळसांड ही नित्याची बाब आहे चालकाच्या मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी उपाययोजना आखल्या जात आहेत , ही निश्चित चांगली गोष्ट आहे त्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने आरोग्यासाठी शिबीर चालक आयोजित केले आहे सदर शिबिरात गुरुकृपा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून तपासणी केली गेली . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा