जिल्ह्यातील ग्रामीण टपाल सेवा कोलमडली ; देशभरात २ लाख ७० हजार डाकसेवक कर्मचारी सपावर

जिल्ह्यातील ग्रामीण टपाल सेवा कोलमडली   ; देशभरात २ लाख ७० हजार डाकसेवक कर्मचारी सपावर

दिघी : वार्ताहर

देशभरातील ग्रामीण डाक सेवकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संप आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील संपात सहभागी झालेल्या डाक सेवकांनी विविध तालुका ठिकाणी तालुका पोस्ट कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत धरणे आंदोलन केले . ग्रामीण डाक सेवकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला . गेल्या २२ मे पासून जिल्ह्यातील पोस्ट सेवा कोलमंडली आहे सातव्या वेतन आयोगा पोटी कमलेश चंद्र समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी , ग्रामीण डाक सेवकांना खात्या अंतर्गत सामावून घेण्यात येवून पगार वाढ मिळावी यासह इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी ग्रामीण डाक नॅशनल युनियन संघटनेच्या आदेशान्वये २२ मे पासून पुकारलेल्या मुदत काम बंद आंदोलनामळे रायगड जिल्ह्यातीळ सर्व साडे तीनशे ग्रामीण डाक घर कार्यालयातील टपाल सेवेसह जलद पोस्ट , आरडी बचत , ठेवी , वीज बिल , ग्रामीण डाक विमा , एटीम , आधार , तिकीट , टेलीफोन बिल आदी सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण परिसरातील डाक कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे सर्वच ठिकाणी डाक सेवक बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने टपाल व्यवस्था विसकाळीत झाली आहे . रायगड जिल्हा ६०० ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर आहेत . नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक ( एनयुजीडीएस ) , ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक , ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉयी युनियन ( एआयपीड्यु जीडीएस ) अशा अनेक पोस्टल संघटनांनी सहभागी होऊन देशभरात एकूण दोन लाख सत्तर हजार ग्रामीण डाक सेवक कर्मचारी संपावर गेले आहेत . मात्र शासनाकडून अद्यापही कोणत्याही हालचाली होत नसल्याचे संताप व्यक्त होतोय . शिवाय ग्रामीण भागात टपाल देखील वेळेवर न आल्याने नेहमी पोस्ट मार्फत व्यवहार करणायांवर संताप करण्याची वेळ आलीय . शासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अशी मागणी रायगड जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सेक्रेटरी जयवंत नाक्ती यांनी सांगितले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा