म्हसळेकरांची पाण्यासाठी पायपीट ; विंधण विहीरींना मंजुरी मिळुनही काम अडकले लालफितीत : महादेव पाटलांचा उपोषणाचा ईशारा



म्हसळा, अरुण जंगम

रायगड जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणुन म्हसळा तालुका ओळखला जातो पावसाचे सरासरी प्रमाण पाहता म्हसळा तालुक्यातील पर्जन्यमान हे सरासरी पेक्षा जास्तच असुनही म्हसळातालुक्यातील दोन गावे व जवळपास नऊ वाड्यांवर दरवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते.मुबलक पाऊस पडुनही पाणी साठविण्याचे नियोजन व वाहत जाणारे पाणी अडविले जात नसल्याने तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.केवळ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यापेक्षा पाण्याचे स्त्रोत व उगमस्थाने बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

-यंदा उन्हाळा सर्वत्र जाणवत आहे .प्रामुख्याने म्हसळा  तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र सरकारी दरबारी अद्याप हालचाली ना वेग आलेला नाही .  विँधण विहीरींचा  साठी चा प्रस्ताव एकवर्ष अगोदर मंजुर केला असून सुद्धा विंधण विहीरींचीची परिपूर्ती करण्यात पंचायत समितीच्या प्रशासन विभागास अपयश आले आहे असे निदर्शनास येते.

तालुक्यातील खामगाव व गायरोणे यादोन गावांना व  नऊ वाड्यांना विंधण विहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते

      म्हसळा तालुक्यात  रायगड जिल्ह्यातील चांगल्या पर्जन्याची नोंद सदैव होते .परंतु शासकीय उदासीनता व जनतेचे अज्ञान यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आलेल्या अपयशामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे .तालुक्यातील जलसाठ्यात कमालीची घसरण झाल्याचे निदर्शनांस येते .पाणी आडवा, पाणी जिरवा ,पाणलोट योजना ,वनराई उपक्रम ,शासनाचे विविध प्रकारचे उपक्रम कागदावरच यशस्वी झाले आहेत .वास्तविक पाहता जनतेस त्याचा काहीच उपयोग  नसल्याचा    प्रत्यक्ष अनुभव   येत आहे. रायगडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी   सूर्यवंशी यांनी  अकरा विधण विहीरींना  तात्काळ मंजुरी देवुन सुद्धा  विंधण विहीरींबाबत स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

 म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील  लोकांना पिण्या पुरते पाणी मिळणे कठीण झाले आहे . गावातील लहान मुले,वयोवृद्ध महिला  पाण्यासाठी वणवण भटकत  असल्याचे विदीर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे .गावातील पाळीव प्राण्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाली आहे .सदर बाबतीत माजी सभापती महादेव पाटील यांनी म्हसळा तहसीलदार यांना निवेदन दिले असुन आठ दिवसात या विंधण विहीरींचे काम पुर्ण न झाल्यास सदर दोन गाव व नऊ वाड्यांमधील लोकाॉना घेवुन उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.

: विंधण विहीरींना मंजुरी मिळालेली गावे

खामगाव,गायरोणे

वाड्या पुढील प्रमाणे

केल्टे चंदनवाडी

निगडी मोहल्ला

रुद्रवट , घुम

खानलोशी बौद्धवाडी

पेडांबे अादिवासी वाडी

पाभरे विठ्ठलवाडी

खामगाव आदिवासीवाडी

जिजामाता हायस्कुलजवळ वरवठणे

"विंधणविहीर खोदणेच्या बाबतीत कंत्राटदाराना संपर्क  करुन देखील येण्यास तयार होत नाहीत विंधण विहीरींना आलेला निधि सदर ग्रामपंचायतीकडे वर्ग कपण्यात येणार असुन विंधण विहीरीचे काम सदर ग्रामपंचायतीमध्ये पुर्ण झाल्यावर सदर ग्रामपंचायतीकडुन  पेमेंट चेकने सदर कंत्राटदारास अदा करणार असल्याने काम लवकरात लवकर पुर्ण होईल"
वाय.एम.प्रभे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती म्हसळा



"सदर गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे अगदी लहान मुलांना देखील पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे या गावांमध्ये विंधणविहीरींना मंजुरी मिळुन एक वर्ष झाले असुन प्रत्यक्षात मात्र कोणतीही पुर्ती करण्यात आली नाही"
माजी उपसभापती, महादेव पाटील

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा