मुरुडजवळ कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर कोसळलं, नांदगावमध्ये अपघात
मुरुड : प्रतिनिधी,
हिंदुस्थानी तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील मुरूडजवळ नांदगाव येथे कोसळले. प्राथमिक माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये चार जण प्रवास करत होते. यापैकी तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून एक महिला पायलट गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिला पायलटला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर तांत्रिक कारणामुळे कोसळले. हेलिकॉप्टरचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सरणा बंदर येथे ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुरूडचे तहसीलदार उमेश पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेतली तसेच नौदलाचे हेलिकॉप्टर मदतीला पोहोचले आहे.

Post a Comment