लोकशाही दिन यावेळी मंगळवारी...

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, ऑगस्ट महिन्यात पहिला सोमवार दि.7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त स्थानिक सुट्टी आहे. त्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन त्यानंतर लगेच येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.8 रोजी करण्यात आले आहे.  लोकशाही दिन मंगळवारी दुपारी एक वाजता राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी याबदलाची नोंद घ्यावी व आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात दि.8 रोजी दुपारी एक वाजता सादर करव्यात असे आवाहन,  जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा