आंबेत (गणेश म्हाप्रळकर)
म्हसळा तालुक्यातील पी.एन. पी शाळा पाष्टी येथील गरजू मुलांना शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चातून वह्या व एसटी पास वाटप केलं.त्यामुळे शिक्षकांचं पालकांच्या वतीने आभार व्यक्त होताना दिसत आहे, संदीप सुरेश पवार, निलेश सुंदर वाघमारे, पायल नरेश नलावडे रोमिल दिनेश घागर अशी वह्या व पास वाटप करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत, भविष्यात कोणतीही मुले शिक्षनाच्या बाबतीत मागे राहता कामा नये या उद्देशाने येथील शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन या आदिवासी समाजातील मुलांसाठी अशाप्रकारचे शालेय साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणाकडे आणण्याचं काम केल आहे.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुदाम माळी ,सोनवणे सर,पाटील सर तसेच बाकीचे शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते
Post a Comment