अनधिकृत शाळेत प्रवेश घेवू नये...


अलिबाग दि.14,(जिमाका:-रायगड जिल्ह्यातील खालील ठिकाणी शासनाच्या परवानगी शिवाय अनधिकृत शाळा सुरु आहेत.अशा अनधिकृत शाळा शैक्षणिक वर्ष 2016-17 या मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय संबंधित संस्थांनी शाळा सुरु करु नयेत. अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी RTE-2009 च्या कायद्याप्रमाणे व याबाबतच्या महाराष्ट्र शासन नियमावली 2011 नुसार उचित कार्यवाही करावी. पालकांनी आपल्या पाल्यांस अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे सदर अनधिकृत प्राथमिक शाळेत प्रवेश घेवू नये. अन्यथा अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यता प्राप्त् प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान  झाल्यास त्यास पालकच जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रा.जि.परिषद रायगड यांनी केले आहे.

अनधिकृत शाळांची नांवे पुढीलप्रमाणे-
अलिबाग-श्री लक्ष्मीनारायण प्राथमिक विद्यामंदीर,
महाड-कै.सिताराम शिवराम कदम मराठी मिडियम स्कूल बिरवाडी,
माणगांव-फलाई इंग्लिश मिडियम स्कूल 
पनवेल-प्लेजंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा, 
पनवेल-एस.ई.अ. अँड वुय ट्रस्ट् मा आशा हिंदी स्कूल सुकापूर, 
पनवेल- लेट.बालाजी कान्हा पाटील,हायस्कुल मोहा., 
पनवेल- प्लेजंट इंग्लिश मिडियम स्कूल प्रायमरी अँड प्रायमरी सांगाडे., 
पनवेल-यु इंग्लिश मिडियम स्कूल चिंचपाडा., 
पनवेल- लेट.चांगुणाबाई ज्ञानदकव ठाकूर एज्युकेशन सोसा.प्रायमरी स्कूल उलवा., 
पनवेल-पराशक्ती इंग्लिश मिडियम स्कूल आपटा., 
पनवेल-होली स्पीरीट इंग्लिश मिडियम स्कूल आपटा., 
पनवेल-श्री सुविधा विद्यालय कामोठे प्रायमरी इंग्लिश., 
पनवेल-ह.भ.प.श्री.दामजी गणपत गोवारी विद्यालय कामोठे प्राथमिक इंग्लिश., 
पनवेल-रायझिंग सन प्री.प्रायमरी स्कूल कामोठे., 
पनवेल-वेदांत पब्लिक स्कूल पनवेल आपटा.,
रोहा-रायगड एज्युकेशन सोसा.प्राथ.शाळा चणेरा., 
उरण- सेन्स प्रायमरी स्कूल जासई., 
सुधागड-रुता गावंड संस्थेचे लिटिल वंडस स्कूल परळी., 
श्रीवर्धन- डॉ.ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल रानवली.
श्रीवर्धन- डॉ.ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल वाळवटी.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा