औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथील
शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन
अलिबाग दि.16, (जिमाका):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि.रायगड येथे शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत अ.भा.व्यवसाय परीक्षा दिलेल्या परीक्षार्थी ह्यांना आवाहन करण्यात येते की, एप्रिल-2016 च्या परीक्षेपर्यंत सर्व अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षांचे अंतिम प्रमाणपत्र ह्या संस्थेत प्राप्त झालेली आहे. तरी संबंधित उत्तीर्ण झालेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांना मूळ गुणपत्र व फोटो पासपोर्ट साईज घेऊन, प्रमाणपत्र संस्थेतून सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घ्यावे असे असे आवाहन संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री. एस.व्हि.पाटील,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि.रायगड यांनी केले आहे.
Post a Comment