अब्जांमध्ये पोहचली फेसबूक मेसेंजरच्या युजर्सची संख्या...


वेब टिम :- मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फेसबूक मेसेंजरचे युजर्स वाढत असून १.२ अब्ज एवढी मेसेंजरच्या मासिक युजर्सची संख्या असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.फेसबूक मेसेंजरचे २० कोटी नवीन युजर्स मागील आठ महिन्यात झाले आहेत. अशी माहिती फेसबूक प्रमुख डेविड यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे. मेसेंजर हे फेसबूकचे मॅसेंजिंग अॅप आहे. फेसबूक अकाउंट असलेला प्रत्येकजण हे अॅप वापरू शकतो. मागील वर्षी जुलैमध्ये फेसबूकने दिलेल्या माहितीनूसार एक अब्ज मेसेंजरचे युजर्स होते. त्यामध्ये आता वाढ होत आहे. तसेच कंपनी सतत या व्हर्जनमध्ये नवीन बदल करत असते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा