म्हसळा : सुशील यादव
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रायगड जिल्ह्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने म्हसळा तालुक्यात मनसेकडून स्वतंत्र उमेदवार उभा करून त्यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिलीप सांगळे यांनी सांगितले. म्हसळा तालुक्यात आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार असून जिल्हा परिषद पांगलोली गटातून शेखर सावंत हे मनसेचे अधिकृत उमेदवार असतील पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याची भूमिका मनसेने घेतली आहे. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून शेखर सावंत यांना विजयी करणार असल्याचे सांगळे यांनी पुढे सांगितले. मनसे स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याने पांगलोली जिल्हापरिषद गटात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
إرسال تعليق