​म्हसळयात राजकीय रणधुमाळी! महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी थेट संघर्ष; १४ अर्ज मागे

​म्हसळा : सुशील यादव 

         जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हसळा तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. तब्बल १४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
​           तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेकाप, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावत आहेत. प्रमुख पक्षांच्या बंडखोरांनी माघार घेतल्याने आता अधिकृत उमेदवारांमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​प्रमुख गट आणि गणनिहाय लढतीचे चित्र
​  
पांगलोली गट अनिकेत विचारे(राष्ट्रवादी), प्रसाद बोर्ले(शिवसेना) ,रोशन पारावे (उबाठा) शेखर सावंत(मनसे), धनसे उसामा (अपक्ष)
पांगलोली गण प्रियांका निंबरे(राष्ट्रवादी )पाटेकर रिया(शिवसेना) चैतन्या गजमल (उ बा ठा) -
साळवींडे गण बबन मनवे (माजी जिल्हा परिषद सभापती राष्ट्रवादी) अमोल पेंढारी(शिवसेना) बाळा म्हात्रे (उ बा ठा) नरेंद्र धोत्रे (अपक्ष)
पाभरे गट अनिल बसवत (राष्ट्रवादी) अकमल कादरी(शिवसेना) संतोष पाटील (शेकाप) -
पाभरे गण समृद्धी चाचले(राष्ट्रवादी) जाधव अमिता(शिवसेना) ज्योती विनायक गिजे (शेकाप) -
खरसई गण 
 लहू म्हात्रे(राष्ट्रवादी)महेश पाटील(शिवसेना) रमेश खोत (उ बा ठा) 
 शेवटच्या दिवशी १४ अर्ज मागे आल्याने पक्षांतर्गत बंडाळी शमवण्यात नेत्यांना काही प्रमाणात यश आले आहे.
​ माजी जिल्हा परिषद सभापती बबन मनवे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांमुळे साळवींडे गणातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.
​     पाभरे भागात महाविकास आघाडीकडून शेकापने आपले तगडे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
​"अर्ज माघारीनंतर आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, मतदारांचा कौल कोणाकडे जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल."

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा