म्हसळ्यात 'मशाल' आणि 'खटारा' एकत्र; श्री धावीर महाराजांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शंखनाद!



म्हसळा : सुशील यादव 

रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच तापले आहे. निवडणुकीसाठी अवघे आठ दिवस उरले असताना, म्हसळा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस (आय) मित्रपक्ष आघाडीने आपल्या प्रचाराचा अधिकृत श्रीगणेशा केला आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीने ताकदीने उमेदवार मैदानात उतरवले आहेत:आघाडीच्या सर्व उमेदवारांनी मंगळवारी म्हसळा येथील श्री गणेश मंदिर आणि तालुक्याचे ग्रामदैवत श्री धावीर देव महाराज मंदिरात जाऊन मनोभावे पूजा अर्चा केली. "विजयाचा आशीर्वाद" मागत मंदिराच्या गाभाऱ्यातून या संयुक्त प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
    या निवडणुकीत महाविकास आघाडीने रणनीती आखून जागावाटप केले आहे:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): पांगलोळी जिल्हा परिषद गट, तसेच साळविंडे आणि पांगलोळी पंचायत समिती अशा तीन जागांवर उमेदवार रिंगणात आहेत.
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप): पाभरे जिल्हा परिषद गट, पाभरे पंचायत समिती आणि खरसई गण अशा तीन जागांवर आपले नशीब आजमावत आहे.
काँग्रेस (आय): काँग्रेसने या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवार उभे केले नसले तरी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मतदार मित्र पक्षांच्या उमेदवारांना पूर्ण ताकदीने पाठिंबा देणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा