टीम म्हसळा लाईव्ह
खरसई आगरी ग्रामस्थ मंडळ मुंबई चे संचालक आणि मुंबई गाव पाटील तसेच श्री. हनुमान आळी मुंबई खरसई चे संचालक सल्लागार आणि श्री हनुमान पाटील आळी मंडळ खरसई मंडळाचे जेष्ठ सल्लागार सदस्य आदरणीय श्री.स्वर्गीय अनंत रामजी शितकर साहेब यांचे वयाच्या ९० व्या वर्षी सोमवार दिनांक ०३/०१/२०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली , तीन मुले , सुना , नातवंडे , असा मोठा परिवार आहे . अनंत रामजी शीतकर यांच्या निधनाने आगरी समाज बांधवांची मोठी हानी झाली आहे. खटाव मिल मध्ये मिल कामगार म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतर साधारणपणे १९३५ पासून त्यांनी आगरी समाजाची सेवा केली. त्याचबरोबर सामाजिक जीवन जगत असताना अध्यात्माची चाड असलेली परिपूर्ण जीवन ते स्वतः तर जगले पण स्वतःबरोबर इतरांमध्येही ही आध्यत्मिक गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयन्त केले.
إرسال تعليق