COVID Vaccination | म्हसळा तालुक्यातील ग्रामिण भागात लसीकरण मंदावले ? तालुक्यात आरोग्य विभागाकडे सक्षम आधिकारीच नाही.



संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात लसीकरणाचा वेग मंदावला आसल्याचे बोलके आकडे पुढे येत आहेत.पाहिला डोस केवळ ६२% नागरिकानी घेतला तर ६०% पात्र लाभार्थानी दुसरा डोसला पाठ दाखविली आहे.शहरात मात्र पहीला डोस अपेक्षीत लाभार्थापेक्षा जास्त नागरीकानी घेतला.परंतु दुसऱ्या डोसकडे नागरीकांनी पाठ दाखवली.तालुक्याचे ग्रामिण भागातील लसीकरण १ला डोस २३९९२ तर दुसरा डोस १६१५१ झाला आहे. तर म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत पहीला डोस ९४०९ तर दुसरा डोस ५३४० झाला आहे.
ग्रामिण भागातील कोविड नियंत्रणात आणण्यासाठी
तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने १८ वर्षावरील नागरीकांचे लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करून १५ ते १८ वयोगटातील २१४९ किशोरवयीन मुलांचे लसीकरण  पूर्ण करायचे आहे.

"म्हसळा तालुक्याची आरोग्य व्यवस्था शासनाचे धोरणा प्रमाणे नाही,म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत स्थापने पासून अधिक्षक नाही, असणारे वैद्यकिय आधिकारी बहुतांशी प्रभारी आहेत, रुग्णाल यांत आवश्यक कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.तीच परिस्थीती तालुका आरोग्य आधिकाऱ्यांची आहे. गेले २ वर्ष हे पद रिक्त आहे. त्यामुळे तालुक्याचे आरोग्य यंत्रणेवर नियंत्रणच नाही,अनेक वेळा लोकप्रतिनिधी ,जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत".
महादेव पाटील,माजी सभापती , पं.स. म्हसळा.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा