म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष , थोर समाजसेवक , शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते , दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि कणघर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्रीपतराव केरू धोकटे यांचे रविवार , २ जानेवारी रोजी रात्रौ महाड येथे उपचारादरम्यान निधन झाले . ते ८० वर्षांचे होते . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगी , चार मुले , सुना , नातवंडे , पतवंडे असा मोठा परिवार आहे . सरपंच धोकटे यांच्या निधनाने शेकाप आणि कुणबी समाज बांधवांची मोठी हानी झाली आहे
إرسال تعليق