नेवरूळ ग्राम पंचायत सरपंचपदी राजेश्री लाड यांची बिनविरोध निवड

 



म्हसळा -प्रतिनिधी

अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या आणि 7 सदस्य संख्या असलेल्या नेवरूळ ग्राम पंचायती मध्ये दोन वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या निवडणुकीत  लोकमतातून थेट निवडणुकीत निवडुन आलेल्या सरपंच आर्या अमित महागावकर यांचे शनिवार दिनांक 13 मार्च 2021 रोजी दुःखद निधन झाल्याने सरपंच पद रिक्त झाले होते.सरपंच पदाच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी  रायगड जिल्हा अधिकारी यांचे आदेशानुसार दिनांक 15 जुन 2021 रोजी शासनाचे नवीन परिपत्रका प्रमाणे सदस्यांनी निवडून दिलेले सरपंच पदाचे निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्गीय स्त्री जागेसाठी नेवरूळ ग्राम पंचायत सदस्या राजेश्री रामचंद्र लाड यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.निवडणुक प्रकिया यशस्वीपणे पार पाडण्याकामी प्रभारी मंडळ अधिकारी तथा निवडणूक अध्याशी अधिकारी  दत्ता करचे यांनी काम पाहिले त्यांना महसूल अधिकारी जितेंद्र टेंबे,ग्रामसेवक योगेश पाटील,तलाठी तात्या यांनी सहकार्य केले.नेवरूळ ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच राजेश्री लाड यांचे मनात सरपंच होण्याची इच्छा नसतानाही  सरपंच होण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली.राजेश्री रामचंद्र लाड यांची बिनविरोध निवड झाली असल्याने नेवरूळ गावातील आघाडी सरकार मधील सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा