दिघी सागरी पोलिसांच्यावतीने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान

 



कोरोनाकाळात काम करणाऱ्या पत्रकारांचे दिघी सागरी पोलिसांनी केले कौतुक

श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर 

      कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. वेळोवेळी लोकांपर्यंत वस्तुनिष्ठ बातमी पोहचवण्यासाठी पत्रकारांनी  दिवसरात्र वृत्तसंकलन करताना जीवाचीही पर्वा केली नाही. यामुळे वृत्तसंकलन करताना फिल्डवर अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. यात दुर्दैवाने अनेक पत्रकारांना आपला जीवही गमवावा लागला. परंतु तरीदेखील पत्रकार न डगमगता थांबले नाहीत. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच प्रशासनाच्या विविध सूचना, निर्बंध व आदेश लोकांपर्यंत बातम्यांच्या माध्यमातून पोहचण्यासाठी पत्रकार नेहमीच तत्पर आहेत.
      पत्रकारांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी पत्रकारांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कौतुकही केले. यावेळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार उदय कळस, अभय पाटील, संतोष रेळेकर व इतर पत्रकार यांना सॅनिटायझर व मास्क भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दिघी सागरी पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, महिला पोलीस उपनिरीक्षक खुतुजा शेख, पोलीस नाईक संदीप चव्हाण व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे अंमलदार, कर्मचारीवर्ग उपस्थित होते


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा