टीम म्हसळा लाईव्ह
दिनांक 16 ते 17 मे 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. सदर कालावधीत वा-याचा वेग खूप जास्त असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
1. मच्छीमार व अन्य व्यक्तिनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये.
2. मच्छिमारांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
3. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये,
4. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे. 5. घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे.
6. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. 7. आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात.
8. वादळाच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील असे सुखा मेवा/खादयपदार्थ जवळ ठेवावेत. 9. चक्रीवादळाबाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा, रेडीओसाठी काही जास्त सेल/बॅट-या जवळ ठेवाव्यात.
10. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे. पिण्याचे पाणी शुध्दीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.
11. अतिवृष्टी व चक्रिवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणा-या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
12. ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा / स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
13. सद्यस्थितीत जिल्हयात Home Quarantine असलेले नागरीक धोकादायक घरात राहत असल्यास चक्रिवादळाचे पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेंकांत मिसळणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
14. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे. 15. मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसीलदार कार्यालयास संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02141-222097/227452 वर संपर्क साधावा किंवा 8275152363 नंबर वर व्हॉटसअॅप करावे.
إرسال تعليق