म्हसळा नगरपंचायतीचा स्थलांतरीत भाजी बाजार समस्येंच्या छायेत.



  • म्हसळा नगरपंचायतीचा स्थलांतरीत भाजी बाजार समस्येंच्या छायेत. 
  • बाजार सुरुहोण्या पूर्वीच लागले ग्रहण.
  • आज म्हसळा कराना भाजी मिळणार नाही.
  • नगरपंचायतीच्या चुकीच्या धोरणाला भाजी व्यापाऱ्यांचा विरोध

संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा बाजारपेठेत प्रचंड गर्दी होते या सततच्या वृत्तपत्रातील बातम्यांमुळे नगर पंचायत,महसुल व पोलीस खाते पुरते भांबाऊन गलेले असताना भाजी दुकानां मुळेच गर्दी होते हा आकस घेऊन नगर पंचायत प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी अगर विक्रेत्याना विश्वासांत न घेता स्थानिक भाजी विक्रेत्यांची अंजुमन शाळेच्या क्रिडां गणावर व्यवस्था केल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी तोंडी जाहीर केले आणि चुकीचा निर्णय घेतला की दि.१५ मे पासून भाजी दुकाने स्थलांतरीत होणार.


स्थलांतराचा निर्णय भाजी-फळे विक्रेत्याना मान्य नाही . 
आज म्हसळा शहरात किमान ३५भाजी विक्रेते आणि २० फळ विक्रेते आहेत. स्थानिक हवामानाची परिस्थीती पहाता हल्ली हवेत किमान३० ते ३८ पर्यंत उष्णता मान व हवेतआद्रताअसते.त्यामुळे विक्री साठी ठेवणारी भाजी आणि फळे ही जमीनी पासून काही उंचीवर आणि उष्णते चे सरक्षण(वरती अच्छादन) करून ठेवावी लागतात. भाजी फळेअंजुमन शाळेच्या क्रिडां गणावर उन्हाच्या तडाक्यात ठेवणार कशी, भाजी आत्यावश्यक बाब आहे तेथेही तेवढीच गर्दी होणार किंवा नाही हे कशा वरून,गोडाऊन मधुन स्थलांतरीत बाजारांत मालाची ने-आण करणे हमाली भाडे यातच सर्व नफा जाणार याचा विचार होणे आवश्य क आहे.




बाजारातील आर्थीक संकटात हातावर जगणाऱ्यांचे होणार हाल
"शहरांत अशोकशेट अडागळे, शकीलशेट बागवान, सुनिल चव्हाण,अनिस भालदार, खालीद कदेकर ,तन्वीर वजगरे,उत्तम वाठोरे हे घाऊक विक्रेते वाशी,पुणे,वाई येथून घाऊक भाजी आणून शहरातील छोटी टपरी,टोपल्या, ठेले घेऊन विकणारे हातावर पोट आणि कुटुंब घेऊन चालणारे अन्य २५-३० व्यापारी आहेत त्यांचा विचार नगर पंचायत प्रशासनाने केला का?" असे विविध समस्या पुढे येत आहेत.


"Covid 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३मार्च २०२०.पासून लागू आहे, त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ लागू करून राष्ट्रीय आपत्ती घोषित करून" कोरोना " विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात युध्दपात ळीवर कामकाज सुरु असतानाही म्हसळा शहरांत व तालुक्यांत, सोशलडिस्टसींग, मास्कचा वापर या महत्त्वाचे नियमांकडे पोलीस ,नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत स्थानिक किरकोळ विक्रेता व अन्य रोजी रोटी पुढे उपायांपेक्षा अपाय अधिक करत असतील तर नागरिक रस्त्यावर उतरू शकतील ,म्हसळ्यातील शासनाच्या परिस्थीतीबाबत मी पालकमंत्री ना.आदिती ताई तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेणार आहे"
महादेव पाटील, ता. प्रमुख , शिवसेना.




                        👆अंजुमन शाळेच्या क्रिडां गणावरनगर पंचायतीने केलेली व्यवस्था

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा