( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळे तालुक्यातील कोळे गावचे गौरु रामभाऊ विचारे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी रहात्या घरी नुकतेच निधन झाले. मूळचे काँग्रेसचे पींड असलेले गौरुदादा हे स्थानिक पंचक्रोशीचे अधारस्तंभ म्हणून सर्वसमाजातील मंडळी त्यांचा आदर करीत असे, त्यानी कोळे ग्रुपग्राम पंचायतीचे सलग १५ वर्ष उपसरपंच पद भूषविलेले होते, अभ्यासू व करारी बाणा म्हणून त्यांचा प्रशास नावर दबदबा होता.त्यांच्या निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.गौरुदादा विचारे यांचे पश्चात पत्नी ,४ विवाहीत मुलगे , सुना , विवाहीत मुलगी ,नातवंडे असा मोठा परीवार आहे.
إرسال تعليق