कोरोनाच्या छायेतील होलीकोत्सव शांततेने व सामाजिक भान राखत साजरा करा - API संदिप पोमण


मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
गेल्या काही दिवसापासून मुंबईसह महाराष्ट्रभर कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याची परीस्थिती दिसत असून संसर्गाचा वेग अधिक असल्याने दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असुन या पार्श्‍वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या होळीच्या सणासाठी मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागातून चाकरमानी आपल्या गावाकडे होळी धुलीवंदन व आपल्या ग्रामदेवतांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संखेने येउ लागतील.त्यामुळे या सण उत्सवाच्या काळात आपल्या परीसरात कोरोना संसर्ग वाढु नये त्याचबरोबर या दिवसांत शांतता व सुवव्यवस्था अबाधित रहावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे बोर्लीपंचतनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदिप पोमण यांनी शनिवार दि. २० मार्च रोजी आपल्या पोलीस ठाण्यात सामाजिक अंतराचे पालन करीत शांतता समितीच्या सभेचे आयोजन केले होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगीतले की "पुढील आठवड्यात साजरा होणारा होळी सण म्हणजे रंग,उत्साह आणि आनंदाचा सण.हा सण साजरा करताना नेहमी सर्वत्र उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो परंतु यावर्षीसुध्दा होळी,धुलीवंदन, रंगपंचमी व तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती या सणांवर असलेले कोरोनाचे सावट या पार्श्वभुमीवर नागरीकांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक भान जपत सण उत्सव साजरे करताना आपली व आपल्या गावाच्या आरोग्याची काळजी घ्यावी,मास्कचा वापर करावा या काळात गर्दी हाेणार नाही,काेराेनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी,त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थता अबाधित ठेउन शांतताप्रिय उत्सवाची आपल्या विभागाची परंपरा कायम ठेऊन कोणत्याही प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकामी सर्व घटकांतील समाजबांधवांनी पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन श्री.संदिप पोमण यांनी उपस्थितांना केले." या बैठकीत सण-उत्सवात गावांतील विजपुरवठा सुरळीत असावा याबाबत चर्चा करण्यात आली व संबधित विभागाकडे याबाबत लोकप्रतिनिधींमार्फत चर्चा करुन योग्य तो मार्ग काढावा असे आवाहन करण्यात आले.या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक श्री.कर्मराज गावडे,पोलीस नाईक संदिप चव्हाण त्याचबरोबर दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरपंच,उपसरपंच सर्वपक्षिय नेते,पोलीस पाटील,शांतता समितीचे सदस्य,तंटामुक्त समितीचे पदाधिकारी,देवस्थान समिती सदस्य, सर्व समाज अध्यक्ष आणि पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा