मा. गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा ; म्हसळा भाजपा ची मागणी


मा. गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा याकरीता भारतीय जनता पार्टी म्हसळा तालुका यांच्या वतीने पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

म्हसळा प्रतिनिधी
मा.गृहमंत्री अनिलजी देशमुख यांचेवर मा.पोलिस आयुक्त मुंबई श्री.परमवीर सिंग यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा रुपये १०० कोटी वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत सदारचे आरोप शासनातील एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याची लेखी पत्राद्वारे राज्याच्या गृहमंत्र्यावर होणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय लांच्छनास्पद आहे या शिवाय सचिन वाझेनी हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केलेला आहे.
पुजा चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू या शिवाय महाराष्ट्राला गेल्या दीड वर्षे पासून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
याबाबत त्यांचा म्हसळा तालुका भारतीय जनता पार्टी जाहीर निषेध करीत आहे. तरी या आरोपानुसार गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी म्हसळा तालुका भारतीय जनता पार्टी यांच्याकडून करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष श्री. प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस श्री.सुनील शिंदे, तालुका सरचिटणीस श्री.महेश पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा प्रभारी सौ.सुनंदा महेश पाटील, तालुका चिटणीस श्री.मनोहर जाधव, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री.प्रशांत महाडीक, ज्येष्ठ मोर्चा सरचिटणीस श्री.सुधाकर शिर्के इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा