मावळा स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने किल्ले पन्हाळगड संवर्धन मोहीम ; ७० हून अधिक दुर्गवीर सहभागी.



माणगाव : सिताराम भोस्तेकर

मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले पन्हळगाडवर ( पन्हळघर बुद्रुक) परिसर स्वच्छता व संवर्धन मोहीम नुकतीच संपन्न झाली. या मोहिमेत पाण्याच्या टाक्या व सभोवतालच्या जवळचा  संपूर्ण परिसर स्वच्छ केला गेला. तसेच ,गड माथ्यावरील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली . मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान च्या वतीने गेली अनेक वर्षे किल्ले पन्हाळगड संवर्धन मोहीम आयोजित केली जाते.
        गड, किल्ल्यावरील  चिरे पुन्हा नव्याने रचण्याचा मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान  प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. या मोहिमेत ६०/७० हून अधिक दुर्गवीर कार्यकर्ते  या मोहिमेत सहभागी झाले होते.
      माणगाव तालुक्यातील ऐतिहािसीकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा हा किल्ला पन्हळगड  तालुक्याची ओळख आहे. या किल्यावर अनेक दुर्गप्रेमी श्रमदानातून गडाची नेहमीच निगा राखून गडाचे संवर्धन करीत असतात.
       मावळा स्वराज्य प्रतिष्ठानची समाजात ओळख झाली ती या गडामुळे याच गडामुळे अनेक मान आम्हा दुर्गवीरांच्या मुलांना मिळाला आहे . याच पन्हळगाडाची नियमित सेवा करणे आणि त्याची निगा राखणे आमचे कर्तव्य आहे . याच कर्तव्याचा भाग म्हणून ही
पन्हळगाडाची श्रमदान मोहीम आम्ही हाती घेत असतो असे मत प्रत्येक मावळा स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. मावळा स्वराज्य प्रतिष्ठानच्या या गडसंवर्धन मोहिमेस विविध प्रकारच्या मदतीसाठी व गड संवर्धन करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मावळा स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तर पन्हळगाडच्या पायथ्याशी असलेल्या पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांनी  मावळा स्वराज्य प्रतिष्ठान दुर्गप्रेमी चे स्वागत करुन आभार मानले.


फोटो ओळ- किल्ले पन्हाळगड संवर्धन मोहिमेत सहभागी दुर्गवीर मावळा स्वराज्य प्रतिष्ठान :- छायाचित्र राम भोस्तेकर

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा