ऐतिहासिक किल्ले बाणकोट व मंडणगडावरील तोफा तोफगाडयांवर विराजमान ; स्वराज्याचा तोफागाडा स्वराज्याला अर्पण
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
परकीय आक्रमकांपासून समुद्रमार्गे होणारा धोका चाणाक्षपणे ओळखून चारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर बांधलेल्या दुर्गरत्नांपैकी एक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट गावानजीकचा हिम्मतगड आजही समुद्राच्या लाटांना तोंड देत अथांग सिंधुसागरावर करडी नजर रोखून खंबीरपणे उभा आहे. छत्रपतींच्या स्थापत्यशास्त्राच्या कल्पकतेमधून साकारलेल्या या दुर्गरत्नांसह जवळच्या मंडणगड किल्ल्यावर असणाऱ्या ऐतिहासिक परंतु दुर्लक्षित तोफांना सन्मानाने तोफागाड्यावर विराजमान करण्याचे कार्य सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र हि संस्था स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करीत आहे.या दोन्ही किल्ल्यांवर एक एक शिवकालीन तोफ असून या तोफांना पुनर्वैभव प्राप्त व्हावे त्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन,दापोली आणि मंडणगड तालुका विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या तोफांना सागवानी तोफगाडे बसविण्याचा निर्णय घेऊन शासनाअंतर्गत असलेल्या राज्य पुरातत्व विभागाकडे या संदर्भात पत्रव्यवहार करुन त्यांच्या परवानगीने आराखडा तयार करुन रविवार दि.६ डिसेंबर रोजी विधिवत पुजनाने स्वराज्याचा हा अमुल्य असा ऐतिहासिक ठेवा तोफगाड्यावर विराजमान करुन "स्वराज्याचा तोफगाडा स्वराज्याला अर्पण" करण्याचा एक दिमाखदार सोहळा बाणकोट व मंडणगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडला.
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवरील संवर्धनाचे कार्य केंद्रीय पुरातत्व विभाग,महाराष्ट्र पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्या मार्गदर्शनाने गेल्या १२ वर्षापासुन करीत आहे संस्थेचे संस्थापक श्री.श्रमिक गोजमगुंडे यांनी हि चळवळ महाराष्ट्रात उभी केली असून आज हजारो दुर्गसेवक या संस्थेला जोडले गेले आहेत.कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी दुर्गसेवकांना लाभत असून या चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे लोकवर्गणीतून आजवर महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवरील ३० तोफांना तोफगाडे बसविण्यात आले आहेत.किल्ल्याच्या दुर्ग अवशेषांचे आणि वास्तूंचे जतन व्हावे आणि त्यांना पुर्नवैभव प्राप्त व्हावे यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान संस्था काम करीत आहे.छत्रपतींच्या शौर्यशाली ऐतिहासिक ठेव्यांचे प्रामाणिकपणे संवर्धन करणाऱ्या संघटनांच्या मागे जर शासन खंबिरपणे उभे राहीले तर महाराष्ट्र देशीच्या प्रत्येक गडदुर्गाला आपल गतवैभव पुन्हा मिळेल.
या कार्यक्रमाला राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे आणि रत्नागिरी विभागाचे सहाय्यक संचालक श्री.विलास वहाने यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी पेण प्रायव्हेट हायस्कूल दहावी १९९३ च्या बॕचचे उच्च न्यायालयाचे सरकारी वकील श्री.श्रीकांत गावंड त्याचबरोबर श्री.हेमंत शाह,श्री.अनिल शिंदे,इंडीयन बुक आॕफ वल्र्ड रेकाॕर्डच्या कु.शर्विका म्हात्रे श्री.दिलीप होळकर,श्री.नरेश पाबरकर,श्री.सुनिल खाडे,श्री.विजय घाटवल,श्री.गजानन पाटिल,श्री. भास्कर पाटिल,श्री.मनोज भाटकर श्री.रामचंद्र कदम,बाणकोट पोलिस पाटिल श्री.सुनिल जाधव,श्री.नारायण शिंदे,सौ.मीना तबिब सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन,अलिबाग,कर्जत मुंबई व पुणे विभागाचे दुर्गसेवक यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्मासाठी श्रीवर्धन तालुका विभागाचे सह्याद्दी प्रतिष्ठानचे दुर्गसेवक कुलदीप अडमकर,योगेश निवाते,अजिंक्य कोळंबेकर,सोमेश बुरुणकर,सचिन जाधव,केतन डोंबले,कुणाल श्रीवर्धनकर,विराज श्रीवर्धनकर,अनिकेत धाडवे,वैभव धाडवे,भारत तांबे,सुयोग तांबडे,संतोष तांबडे, सिध्देश जाधव, ऐश्वर्य विलणकर,योगेश तोडणकर,मनोज खोचरे,राज भुवड,महादेव रेवाले, चैतन्य तबीबी आणि सागर हरपाल यांनी विषेश मेहनत घेतली.संस्थेचे संस्थापक श्री.श्रमिक गोजमगुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर उपाध्यक्ष श्री. समीर म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
إرسال تعليق