वांजळे येथील दुर्लक्षित मदगड किल्ल्याची पालकमंत्री आदिती तटकरेंकडुन पहाणी



मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे या श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांच्या भुमिपुजन व लोकार्पण कार्यक्रमासाठी श्रीवर्धन दौऱ्यावर असताना त्यांनी बोर्लीपंचतन जवळील वांजळे येथील दुर्लक्षित असणाऱ्या ऐतिहासिक वनदुर्ग मदगड किल्ल्याच्या परीसराला शनिवार दि.५ डिसेंबर  रोजी भेट देउन पहाणी केली.
 सध्या या वनदुर्गाची पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असुन किल्ल्यात सर्वत्र झुडपे पसरली असुन जुन्या वाड्याचा चौथरा,घरांची जोती व त्यांचे विखुरलेले चिरे दिसुन येतात.काही ठिकाणी तटबंदी पहायला मिळते किल्लातील पाण्याचे कुंड मातीने भरले आहे.त्यामुळे किल्ल्याची तातडीने देखभाल व दुरुस्तीचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी गेले कित्येक वर्षे शिवप्रेमी संघटना आणि वांजळे ग्रामस्थांकडुन केली जात होती.
शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पाउलखुणा जपणाऱ्या व दैदिप्यमान शौर्याचे साक्षिदार असणारे महाराष्ट्रातील गड किल्ले सवंर्धनाच्या उदासीन धोरणांमुळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यापैकीच एक असणाऱ्या या ऐतिहासिक वनदुर्गाला नवसंजिवनी देउन त्याचे जतन करुन पर्यटनाच्या माध्यमातुन विकास केल्यास दुर्देवाने आपल्याकडुन विस्मृतीत गेलेल्या शौर्यशाली इतिहासाचा उलगडा होण्याबरोबरच त्याची महती पुढच्या पिढीला समजण्यासाठी फार मोठी मदत होइल त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होउन गावाच्या विकासालासुध्दा चालना मिळण्यास मदत होइल या पार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या दौऱ्यावेळी वांजळे गावाला भेट देउन किल्ल्याच्या परीसराची पहाणी करुन त्याबाबतच्या सर्व शासकिय नोंदी व इतर माहीती संदर्भातील असणारी कागदपत्रे लवकरात लवकर पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याच्या सुचना यावेळी उपस्थीत असलेले श्रीवर्धन तहसीलदार श्री.सचिन गोसावी यांना दिल्या.सदर प्रसंगी सहाय्यक गटविकास आधिकारी बाळासाहेब भोगे,सार्वजनिक बांधकाम उप अभियंता डोंगरे,सरपंच शुभांगी जाधव,ग्रामपं.सदस्य,ग्रामसेवक शंकर मयेकर,तलाठी सुनिल भगत,तंटामुक्ति अध्यक्ष आत्माराम गायकर,वांजळे ग्रामस्थ त्याचबरोबर राष्ट्रवादीचे मंहमदभाई मेमन,नंदकुमार पाटील, सुचिन किर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा