जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

टीम म्हसळा लाईव्ह

रायगड जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतींचे सन 2020-2025 या कालावधीत साठीचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तब्बल 405 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी महीला विराजमान होणार आहेत.
यासंदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रसिद्ध केली आहे.
जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायती पैकी सर्वाधिक ग्रामपंचायती महाड तालुक्यातील 134 तर सर्वात कमी ग्रामपंचायती मुरुड तालुक्यात 24 आहेत.

  प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती-जमाती व प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे.

      रायगड जिल्हयात ग्रामपंचायतींच्या एकूण 809  पदातील अनुसूचित जातीसाठी 33 ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असून, त्यातील खुल्या प्रवर्गासाठी 16 तर  17  पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत.

      अनुसूचित जमातीसाठी 124 पैकी खुल्या प्रवर्गासाठी 62 व  महिलांसाठी 62 पदे तर     

       नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण 218 पदांपैकी 109 पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे आरक्षित असणार आहेत, 

      सर्वसाधारण जागांसाठी एकूण 434 पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 217 तर  महिलांसाठी 217  पदे राखीव असणार आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी कळविले आहे.

      तालुकानिहाय सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :-

       अलिबाग- ग्रामपंचायत संख्या -62,अनु.जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-0, अनु.जमाती आरक्षित जागा-खुला 6, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे-खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 16.

      मुरुड- ग्रामपंचायत संख्या- 24, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-0, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 2, महिला 3, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 3, महिला 3, सर्वसाधारण जागा- खुला 6, महिला 6.

   पेण- ग्रामपंचायत संख्या- 64, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-0, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 7, महिला 7, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा- खुला 16, महिला 16.

       पनवेल- ग्रामपंचायत संख्या- 71, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-2, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 6, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 10, महिला 9, सर्वसाधारण जागा- खुला 19, महिला 19.

      उरण- ग्रामपंचायत संख्या- 35, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-0, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 1, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 5, महिला 4, सर्वसाधारण जागा- खुला 11, महिला 11.

       कर्जत- ग्रामपंचायत संख्या- 54, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 8, महिला 8, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 7, महिला 8, सर्वसाधारण जागा- खुला 10, महिला 11.

     खालापूर- ग्रामपंचायत संख्या- 44, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 5, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा- खुला 10, महिला 10.

      रोहा- ग्रामपंचायत संख्या- 64, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-2, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 5, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा- खुला 17, महिला 17.

     सुधागड- ग्रामपंचायत संख्या- 34, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-0, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 6, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 5, महिला 4, सर्वसाधारण जागा- खुला 6, महिला 7.

      माणगाव- ग्रामपंचायत संख्या- 74, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-2, महिला-2, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 4, महिला 3, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 10, महिला 10, सर्वसाधारण जागा- खुला 21, महिला 22.

        तळा- ग्रामपंचायत संख्या- 25, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 2, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 3, महिला 4, सर्वसाधारण जागा- खुला 6, महिला 6.

       महाड- ग्रामपंचायत संख्या- 134, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-3, महिला-3, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 4, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 18, महिला 18, सर्वसाधारण जागा- खुला 42, महिला 41.

   पोलादपूर- ग्रामपंचायत संख्या- 42, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-2 अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 1, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 6, महिला 5, सर्वसाधारण जागा- खुला 13, महिला 12.

     श्रीवर्धन- ग्रामपंचायत संख्या- 43, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-0, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 3, महिला 3, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा- खुला 12, महिला 12.

     म्हसळा- ग्रामपंचायत संख्या- 39, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 2, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 5, महिला 6, सर्वसाधारण जागा- खुला 11, महिला 11.

       जिल्ह्यातील एकूण 809 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती आरक्षित जागा- खुला-16, महिला-17 अनुसूचित जमाती आरक्षित जागा- खुला 62, महिला 62, नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 109, महिला 109, सर्वसाधारण जागा- खुला 217, महिला 217.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा