कोविड केअर सेंटरवर शासनाचा लाखोंचा खर्च ; पाच महिन्या नंतरही कोविड केअर सेंटरची सुरुवात नाही

(फोटो :म्हसळ्यात कोविड केअर सेंटर आय.टी.आय.ची आगरवाडा इमारतीत सुरु करण्यासाठी बांधकाम विभाग युध्द पातळीवर प्रयत्नशील आहे.)


म्हसळ्यात कोविड केअर सेंटरची अजब तऱ्हा :तब्बल पाच महिने झाले तरी कोविड केअर सेंटरची सुरुवात नाही ; कोविड केअर सेंटरवर मात्र शासन करीत आहे लाखो रुपये खर्च


संजय खांबेटे : म्हसळा
मार्च-एप्रिल २०२० दरम्यान राज्यांत,जिल्ह्यात व तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आसतानाच प्रत्येक तालुका मुख्यालया चे ठिकाणी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार व पालकमंत्री ना.अदीती तटकरे यांच्या प्रयत्नाने म्हसळा तालुक्यासाठी आगरवाडा येथील आय.टी.आय. इमारतीत लौकरच कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले.मे २०२० च्या अखेरीस लाखो रुपये खर्च करून आय.टी.आय.ची इमारत व १३ खोल्याची रंगरंगोटी , गरम पाण्यासह अद्ययावत सुविधेची प्रसाधन गृहे,मुबलक पाणी पुरवठा व ड्रेनेज या सोयीने सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदार तथा कोरोना कमांडर यानी ते मे अखेरीस ताब्यात घेतले परंतु ३जूनच्या निर्सग चक्री वादळांत इमारतीचे छप्पर, पाण्याच्या टाक्या यांचे प्रचंड नुकसान झाले .सदरची इमारतीची अद्यापही दुरुस्ती झाली नाही त्यामुळे म्हसळयाचे शासकीय कोव्हीड केअर सेंटर ताटकळत पडले असून ५ महिन्यांत स्थानिक लोकप्रति निधी अगर प्रशासकीय आधिकाऱ्यानी कोव्हीड केअर सेंटरसाठी पाठपुरावा न केल्याने अखेर प्रेस क्लब म्हसळाने तालुक्याचे आरोग्य यंत्रणेसह कोव्हीड केअर सेंटर सुरू करणेबाबत खासदार सुनिल तटकरे याना साकडे घातले व C.C.C लौकरच सुरू करण्याची मागणी केली आहे.


तालुक्यात Covid 19चे रुग्णांसाठी सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु नसताना लाखो रुपये खर्च
तालुक्यात अद्याप पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३१४ झाली आहे.एकाही स्थानिक रुग्णाला कोविड केअर सेंटरचा फायदा न झाल्याने कोरोना तपासण्या याबाबत स्थानिकांची नाराजी आहे. यामुळे नव्याने रुग्णांचा शोध ,काँटॅक्ट ट्रेसींग साठी स्थानिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे समजते.तालुक्यात
अद्यापही शासकीय कोविड केअर सेंटरची सुरवात नसताना तालुका आरोग्य आधिकारी यानी म्हसळा येथील C.C.C. साठी १) वैद्यकीय अधिकारी २) डाटा एंट्री ऑपरेटर ३) पॅथालॉजीस्ट ४) आरोग्य सेविका एवढा स्टाफ ऑगस्ट २०२० पासून नेमलेला आहे. त्यांच्या वेतनावर रु.८० ते ८५ हजार मासिक खर्च केले जात आसल्याचे समजत आहे.

" म्हसळा तालुक्यात अद्यापही C.C.C. (कोविड केअर सेंटर ) सुरु केलेले नाही, आगरवाडा येथीलआय.टी.आय इमारतीत सुरु करण्याचे होते अद्याप सुरु करण्यात आलेले नाही"
शरद गोसावी, कोव्हीड कमांडर तथा तहसीलदार म्हसळा


"आय.टी.आय.ची इमारतीमध्ये Covid 19चे रुग्णांसाठी १३ खोल्याची रंगरंगोटी, प्रसाधन गृहे, मुबलक पाणी पुरवठा व ड्रेनेज या सोयी मे अखेरीस केल्या होत्या, निर्सग वादळामध्ये इमारतीचे नुकसान झाले आहे दुरुस्ती व नव्याने रंगरंगोटी सुरू केली आहे"
श्रीकांत गणगणे, उपविभागीय बांधकाम अधिकारी . सा.बांधकाम,श्रीवर्धन

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा