विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतला विकास कामांचा आढावा


रायगड जिल्हा परिषद येथे  विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे  यांनी भेट घेऊन घेतला  विकास कामांनचा आढावा

राम भोस्तेकर /माणगाव
आज रायगड जिल्हा परिषद येथे  विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट देऊन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग व शिक्षण विभागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. जनतेची ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना  समंधीत अधिकारी यांना आमदार अनिकेत तटकरे यांनी दिल्या.
करोना महामारी मुळे आधीच जनता त्रस्त झालेली असताना शासनाने नाईलाजाने विकासनिधीला कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत. उपलब्ध विकासनिधीतून जनतेच्या जिव्हाळ्याची कामे लवकरात लवकर मार्गी लागावी या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकारी यांना ती कामे योग्य वेळेत पूर्ण कराव्या, अशा सूचना  आमदार यांनी दिल्या तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत जिल्हा परिषदेतील प्रलंबित कामे मार्गी लावण्याबाबत सखोल चर्चा केली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा