राज्यातील कोरोनाची स्थिती अद्याप सामान्य झाली नाही त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत.-उदय सामंत


राज्यातील कोरोनाची स्थिती अद्याप सामान्य झाली नाही.त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत.-उदय सामंत

टीम म्हसळा लाईव्ह

राज्यातील कोरोनाची परस्थिती निवळत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील कोरोनाची स्थिती अद्याप सामान्य झाली नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवणे योग्य नसल्याने आत्ताच महाविद्यालय सुरू करता येणार नाहीत. त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. हे ऑनलाईन शिक्षण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा