"सतत हात धुवा सांगणाऱ्यांच्या नळाला पाणी नाही" : मेंदडी प्रा.आ. केंद्राची केवीलवाणी स्थिती.



संजय खांबेटे :  प्रतिनिधी म्हसळा 
मेंदडी प्रा.केंद्राचे अखत्यारीत मेंदडी, वारळ व खरसई ही तीन उपकेंद्रे १६ ग्रामपंचायती व छोटी मोठी २४ गावे वाडया असून सुमारे १४००० लोकसंख्येला या प्रा.आ.केंद्राचे माध्यमातून आरोग्य सेवा मिळत असतात, प्रति महा.सरासरी १००० ते १२०० रग्णांवर उपचार होत असतात. सातत्याने हात धुवा सांगणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत प्रा.आ. केंद्रातील रुग्णाना व कर्मचाऱ्याना हात धुण्यासाठी पाणी नसण्याची केवील वाणी परिस्थीती आली आहे.आपल्या हद्दीतील नागरीक स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्या करता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम हिवताप, हत्तीरोग, टी.बी. लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे ताप, गरोदरपण,  बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे. आशाआरोग्य विषयक सेवा पुरविल्या जात असतात. या विविध आरोग्य सेवांसोबतच मुंबई वरून सुमारे ६५०० आलेल्या चाकरमान्याना कोरंटाईन व पश्चात अन्य सेवा पुरवत असतानाच प्रा.आ.केंद्रातील पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे वॉश बेसीन, बाथरुम व अन्य ठिकाणी नळाना पाणीच नसल्याची केवील वाणी तक्रार रुग्णानी थेट आमच्या प्रतिनिधींजवळ केली. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनांत गुंतल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडीच्या दवाखानाच्या मुलभूत व प्राथमिक सोयी सुविधा कडे जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहेत.आमच्या प्रतिनिधीनी प्रत्यक्ष भेट दिली असता दवाखान्या बाहेरील एक नळ सुरू आहे तर अंतर्गत वितरण व्यवस्था अगर स्टोअरेज टाक्या रिकाम्या होत्या नळाना पाणी नव्हते. 

"शासनाच्या आरोग्य सेवा चांगल्या असतात म्हणून मी जेष्ठ नागरिक असूनही दवाखान्यात आलो असता, येथील नळाना पाणी आणि काम करणाऱ्या आरोग्य सेवक-सेविकाना पगार नसल्याचे समजले"स.नजीरी, मेंदडी

"मागील रुग्ण कल्याण समितीच्या दोन सभांतून प्रा.आ.केंद्र, मेंदडी साठी आर्तगत पाणी पुरवठा व्यवस्था दुरुस्त करून पाणी पुरवठा पूर्ववत व्हावा याबाबत ठराव घेतले .यासाठी अनेक वेळा पदाधिकारी व अधिकारी यांच्या कडे पाठपुरावा केला, क्लार्क साहेब ३ महीने कार्यालयात येत नसल्यामुळे काम थांबलेले आसल्याचे सांगण्यात आले "
महेंद्र पारेख, रुग्ण कल्याण समिती, प्रा.आ. केंद्र, मेंदडी.


"जिल्हा परिषद प्रशासना मार्फत जिल्ह्यातील आरोग्य सेवक-सेविकांचे वेतन विलंबीत नाही. मेंदडी ग्रामपंचायत हद्दींत पाणी टंचाई आहे असे समजते"
डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.आलिबाग.

"म्हसळा तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीत सुरळीत पाणीपुरवठा आहे. प्रा.आ.केंद्र मेंदडी येथील अंर्तगत वितरण व्यवस्थेत काही अडचणी असतील"युवराज गांगुर्डे, उप- अभियंता ,ग्रा पा. पुरवठा, म्हसळा




Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा